जुन्नर / रफिक शेख : केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरुन नाभिक समाजाचा अपमान केल्याबद्दल त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांनी समाजाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रीय जनसेवा पक्षाने जुन्नर तहसिलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रीय जनसेवा पक्षाने निवेदनात म्हटले आहे कि, राजकीय भाषणे देताना, बहुजन समाजाला उद्देशून भाषणे देण्यासाठी बहुजन समाजातील जाती यांच्या दावनिच्या जहांगीर नाहीत तरी सुध्दा ३ वर्ष अगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बहुजन समुहातील नाभिक समाजाचा निंदनीय शब्दात अपमान केला आहे.
जुन्नर : माजी सभापती कृष्णा लांडे आणि मुलावर बिबट्याचा हल्ला !
यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांनी समाजाची केलेल्या बदनामी बद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा संपूर्ण राज्यातील नाभिक समाजासह बहुजन समाज आंदोलन करील असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर अध्यक्ष अरूण क्षिरसागर, उपाध्यक्ष सचिन कालेकर, तेजपाल रायकर, सचिव नित्यानंद नेवकर, कार्याध्यक्ष सुनिल खंडागळे, किसन कदम, नामदेव नायकोडी, अनिता रायकर, आदींची नावे आहे.
जुन्नर : महिला दिनानिमित्त भव्य संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन, तहसिलदारांच्या हस्ते बक्षीस वितरण