जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर शहरातील तेली बुधवार पेठ येथील श्री तुळजाभवानी सभागृहात शुक्रवार (दि.०२) रोजी तुळजापूरच्या तुळजा भवानी पलंगाचे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पलंगाचा मुक्काम जुन्नरमध्ये ९ दिवस राहणार असून रविवार (दि. ११) रोजी प्रस्थान होणार आहे.
आगमन प्रसंगी मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत महिला-पुरुषांनी सहभाग घेतला होता. विविध वाद्यवृदांनी तसेच जिवंत देखावे सादरकर्त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
तुळजाभवानी पलंग उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून त्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबीर, अन्नकोट स्पर्धा, मंगळागौर कार्यक्रम, दांडिया गरबा, भांडारा महाप्रसाद व त्यानंतर रविवार दि.10 रोजी या पलंगाचे जुन्नर हुन तुळजापूर कडे प्रस्थान होणार आहे. जुन्नर परिसरातील सर्व भाविकांनी या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन तिळवण तेली समाज बांधव जुन्नर च्या वतीने करण्यात आले आहे.