Sunday, December 22, 2024
Homeताज्या बातम्याजुन्नर : जगातील सर्वात मोठी शिवाजी महाराजांची प्रतिमा रांगोळीतून साकारणार !

जुन्नर : जगातील सर्वात मोठी शिवाजी महाराजांची प्रतिमा रांगोळीतून साकारणार !

जुन्नर : जुन्नर तालुक्यात तिथीनुसार २१ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमांचे आयोजन जुन्नर तालुका शिवसेना परिवाराकडून करण्यात आले आहे. या औचित्याने किल्ले शिवनेरीच्या चहूबाजूंनी गडाच्या दिशेने विद्युतझोत टाकून गड रात्री प्रकाशमान करण्यात येणार आहे. तसेच शिवनेरीच्या पायथ्याशी जगातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारली जाणार असल्याची माहिती माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळीतून त्रिमितीय पद्धतीने प्रतिमा साकारण्याची लगबग शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या शंकरराव सुट्टे पाटील विद्यालयाच्या क्रीडांगणावर ६५ कलाकारांकडून सुरू आहे. त्यासाठी पाच दिवस काम सुरू राहणार आहे. 

माळशेज घाटात देशातला पहिला पारदर्शक वॉक-वे, पर्यटकांना हवेत चालण्याचं थ्रिल अनुभवता येईल

यावेळी बोलतांना माजी आ. सोनवणे म्हणाले की, जुन्नर मध्ये सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात येणार आहेत. मात्र होर्डिंगवर शिवाजी महाराजांचीच भव्य छायाचित्रे लावली जातील ‌‌. कोणत्याही नेत्यांची छायाचित्रे लावली जाणार नाही, असेही ते म्हणाले. 

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी झाली, त्यावेळी होर्डिंगवर नेत्यांचे मोठे फोटो लावण्यात आले होते. त्यावर देखील शिवसेनेकडून टिका करण्यात आली होता. नेत्यांचा फोटो न लावण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीला जणू एक प्रकारचा टोलाच आहे.

तमाशा कलावंत शासनाच्या अनुदानापासून वंचित, केल्या ‘या’ मागण्या

इतर कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

– शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे नारायणगाव येथे शिवचरित्रावर व्याख्यान.

– आळेफाटा येथे ‘चला हवा येऊ द्या’ हा मनोरंजनपर कार्यक्रम.

– डोमेवाडी येथे बैलगाडा शर्यती

कल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे मार्गासाठी लागणारा आर्थिक भार राज्य सरकार उचलणार !

संबंधित लेख

लोकप्रिय