जुन्नर : केवाडीमध्ये दडपशाहीचं राजकारण सुरु असल्याचा आरोप पांडुरंग महाराज लांडे यांचे पुतणे विकास महाराज लांडे यांनी ‘महाराष्ट्र तुफान’ या युट्यूब चँनेल शी बोलताना केला आहे.
तसेच विकास महाराज लांडे म्हणाले की, माझे चुलते पांडुरंग महाराज लांडे हे कुकडेश्वर येथे जे बोलले ते सत्य आहे. हे वीस वर्षापासून पहात आलो आहे. आमच्या गावातील ४५ कुटुंबांना योजनांंचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप करत केवाडी गावातील दडपशाही चालू आहे.
तसेच हि दडपशाही थांबविण्याची मागणी विकास महाराज लांडे यांनी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे केली आहे.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, मी कोणाच्या दबावाखाली बोलत नाही. हे घडले आहे ते मी सर्वांसमोर मांडत आहे. तसेच मी वारकरी संप्रदायाचा माणूस असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.