Friday, March 29, 2024
Homeग्रामीणपुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी एसएफआयचे आंदोलन

पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी एसएफआयचे आंदोलन

घोडेगाव (दि.०९) : राज्यातील विद्यार्थी व युवकांच्या विविध मागण्यांना घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. 

राज्यभरात विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले असून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातही या आंदोलनास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पहायला मिळाला. आंबेगाव मधील घोडेगाव, मंचर तर जुन्नर तालुक्यातील कोटमवाडी, सितेवाडी, तळमाची येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी हातात मागणी फलक घेऊन राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. या सोबतच अनेक विद्यार्थी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मेल देखील पाठविले.

SFI – DYFI आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे 

१) स्वप्नील लोणकर याच्या कुटूंबियांना शासनाने योग्य ती मदत करून स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना दिलासा द्यावा.

२) आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी. तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागांवर ३१ जुलै पर्यंत भरती झाली पाहिजे.

३) सरकारी विभागातील सर्व भरत्या एमपीएससीच्या माध्यमातून कराव्यात. शासकीय विभागातील भरतीसाठी महापोर्टल बंद करावे. सरकारी विभागासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेची खासगी एजन्सींना आऊटसोर्सिंग बंद करावी, कारण खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व अचूकता नसते.

४) विविध सरकारी विभागांमधील सर्व रिक्त जागा घोषित कराव्यात. भरती प्रक्रिया पुरेशा पारदर्शकतेने पूर्ण झाली पाहिजे.

५) विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकणार्‍या खासगी शाळांचा परवाना सरकारने रद्द करावा.

६) खासगी शाळांमध्ये  ५०% फी कमी करावी. हे नोंद घेण्यासारखे आहे की, वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्यामुळे गेल्या वर्षी शाळांचा ऑपरेटिंग खर्च बराच घटला आहे.

७) आरटीई प्रवेश योग्य प्रकारे होत आहेत याची खातरजमा सरकारने केली पाहिजे.

८) आरटीई प्रवेशामुळे खासगी शाळांना फीच्या रकमेचा अनुशेष सरकारने तातडीने दिला पाहिजे.

९) तातडीने प्राध्यापक भरती करण्यात यावी.

१०) आदिवासी वसतिगृहांच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावेत. 

११) देशातील सर्व विद्यार्थ्यांचे लवकरात मोफत लसीकरण करण्यात यावे.

इ. मागण्याचे मागणी फलक घेऊन विद्यार्थी कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांत घरी राहून हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे विलास साबळे, सचिन साबळे, प्रवीण गवारी, अविनाश गवारी, समीर गारे, रुपाली खमसे, महेश गाडेकर, स्नेहल साबळे, आशा लोहकरे, अक्षय घोडे आदी विद्यार्थी कार्यकर्त्यांनी या निषेध आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडली.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय