Photo : Rohit Raghatwan |
जुन्नर : सोनवळे (ता. जुन्नर) येथील रोहित जनार्दन रघतवान या आदिवासी शेतकरी कुटुंबातील युवकाची महाराष्ट्र शासन अन्न विश्लेषक राजपत्रित अधिकारी वर्ग-1 पदी नियुक्ती झाली आहे.
रोहित हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. वडील जनार्दन आणि आई ढवळाबाई यांनी शेतीत काबाडकष्ट करून मुलाला शिक्षण दिले. त्यांना दोन मुली आणि दोन मुले. रोहितची शिक्षणातील आवड लक्षात घेऊन त्याचे शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला.
जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात प्रथमच सेंद्रिय पध्दतीने कांदा लागवड, शेतकऱ्याचा दिशादर्शक प्रयोग
रोहितने श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथून २००६ साली बीएस्सी ची पदवी घेतली. त्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले आणि फर्ग्युसन महाविद्यालयातून २००९ साली एमएस्सी ची पदवी घेतली.
मी आदिवासी भागातून आलेलो आहे, मला अजून पुढे जायचे आहे. आदिवासी भागातील मुलांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जावर मला अधिक काम करायचे आहे. माझी पुढे केंद्रात जाण्याची इच्छा आहे, तिथे जाऊन काम करायचे आहे ज्यामुळे चांगली धोरणे घेऊन ती प्रभावीपणे राबविता येतील. त्या संदर्भातील परीक्षा दिली असून त्याचा लवकरच निकाल येईल.
– रोहित रघतवान
ब्रेकींग : ‘या’ राज्याने केला घरच्या घरी मोफत उपचार देणाऱ्या डायलिसिस योजनेचा शुभारंभ
रोहितला क्लास वन अधिकारी बनायचे होते. परंतु शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक रसायन शास्त्रज्ञ या पदावर नोकरी केली. परंतु गेली दहा वर्ष सेवा बजावत असताना वर्ग 1 चा अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आपले प्रयत्न चालूच ठेवले. केंद्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण मार्फत घेतली जाणारी “अन्न विश्लेषक” हि परीक्षा 2019 मध्ये पास झाला. पुढे केंद्रातही जाऊन काम करण्याची त्याची इच्छा आहे, तिथे जाऊन चांगली धोरणे घेऊन ती प्रभावीपणे राबविण्याचे त्याचे धैय्य आहे, त्या संदर्भातील परीक्षाही दिली असून त्याचा लवकरच निकाल येईल.
आज त्याची महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राजपत्रातून अधिसूचना काढून “अन्न विश्लेषक” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान त्याने २०२० मध्ये आपली एलएलबी ची पदवी पूर्ण केली.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती
10 वी व 12 साठी सुवर्णसंधी ! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती