जुन्नर : निमगिरी (ता.जुन्नर) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गाव पातळीवर काम करणाऱ्या महिला मजूरांचा जागतिक महिला दिनानिमित्त तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अखिल भारतीय किसान सभेच्या प्रयत्नातून आणि तालुका प्रशासनाच्या पुढाकारातून रोजगार हमीचे काम सुरू आहे. आज तालुक्याचे तहसील यांनी विविध गावांना भेट देत मजूरांशी संवाद साधला.
जुन्नर : निमगिरी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा !
यावेळी बोलतांना तहसीलदार सबनिस म्हणाले, रोजगार हमी योजनेतून महिला अत्यंत चांगले काम करत आहेत. गावाच्या शाश्वत विकासासाठी विविध योजना राबवण्यासाठी तालुका प्रशासन प्रयत्नशील आहे. पर्यटन विकासित करण्यासाठी आणि गावातच रोजगार निर्मिती गावांतील महिलांचा पुढाकार घेतला पाहिजे, महिला दिनानिमित्त खूप शुभेच्छा देत स्वावलंबी बनविण्यासाठी महिलांनी एकत्र आले पाहिजे असेही प्रतिपादन सबनिस यांनी केले.
यावेळी मंडल अधिकारी तळपे, मनरेगा समन्वयक दुर्गेश गायकवाड, बोराडे, निमगिरी गावच्या सरपंच सुमन साबळे, किसान सभेचे संजय साबळे, ग्रामसेवक दिघे, पेसा समन्वयक अनुसया लांडे, झुंबर साबळे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
जुन्नर : महिला दिनानिमित्त भव्य संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन, तहसिलदारांच्या हस्ते बक्षीस वितरण
जुन्नर : माजी सभापती कृष्णा लांडे आणि मुलावर बिबट्याचा हल्ला !