Thursday, September 19, 2024
HomeNewsजुन्नर तालुक्यातील गुणवंत शिक्षक पुरस्कार मंगल ढोमसे यांना प्रदान

जुन्नर तालुक्यातील गुणवंत शिक्षक पुरस्कार मंगल ढोमसे यांना प्रदान

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा, हडसर येथील उपशिक्षिका मंगल रमेश ढोमसे यांना उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केल्याबद्दल तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते ओतुर येथील शुभश्री लाॅन्स येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषद, पुणे माजी अध्यक्ष देवराम लांडे, माजी जि.प.सदस्य मोहित ढमाले, माजी जि.प.सदस्य गुलाब पारखे, माजी जि.प.सदस्य अंकुश आमले, माजी पंचायत समिती सभापती विशाल तांबे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, माजी उपसभापती सुरेखा वेठेकर, संगिता वाघ, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी संचिता अभंग, शिवाजी डुंबरे, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि तालुक्यातील प्राथमिक शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगल ढोमसे यांच्या या यशाबद्दल जुन्नर तालुका केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव, राजुरचे केंद्रप्रमुख भांगे, हडसर येथील ग्रामस्थ, जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे, सचिव रमेश ढोमसे यांनी अभिनंदन केले.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय