जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील इंगळुन येथील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. व्यक्तिमत्व विकास, नाते-संबंध आणि सोशल मीडिया या विषयांवर रोटरीचे विजय कोल्हे, चेतन शाह आणि विलास कडलग यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. येथील आदिमाया विद्यालयात रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या माध्यमातून बेंचेस तसेच स्वच्छता गृह उभारून दिल्याची माहिती प्रकल्प समनव्यक धनंजय राजूरकर यांनी दिली.
याप्रसंगी रोटरी अध्यक्ष हितेंद्र गांधी, तुषार लाहोरकर, मुख्याध्यापक मारुती ढोबळे, संजयकुमार लांडे, निसार इनामदार, राजू वामन, डमाळे दत्तात्रय तसेच विद्यार्थी उपस्थित होते.