जुन्नर : युक्रेन वरून सुखरूप परतलेले जुन्नरचे विद्यार्थी. |
जुन्नर / हितेंद गांधी : “भारतीय असल्याचा अभिमान पूर्वीपासूनच होता, मात्र या युद्धजन्य परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी केवळ भारतीय असल्यामुळे आम्हांला झालेल्या विशेष मदतीमुळे आमच्या देशावरील प्रेमाचे आता गर्वात रूपांतर झाले आहे” अश्या भावना युक्रेनवरून जुन्नरला सुखरूप परतलेल्या तीनही मुलांनी व्यक्त केल्या आहेत.
मंदिरा संजय खत्री, मलाईका रणजित चव्हाण व अक्षद रुपेश दुबे हे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी जुन्नरला शनिवारी (दि. ५) सकाळी सुखरूप पोहचले आहेत. शहरातील नागरिकांनी फुले उधळून, हार घालून वाजत गाजत त्यांचे जंगी स्वागत केले.
जुन्नर : खिरेश्वरची मुलं लई हुशार..!
दरम्यान या भीषण अनुभवाबाबत बोलताना मंदिरा खत्री हिने सांगितले की टर्नोपिल शहरातून रोमानियाच्या हद्दीपर्यंत जाताना खूप धाकधूक वाटत होती. प्रचंड थंडी होती. रस्त्यात रॉकेटमाऱ्याच्या खुणा पाहून काळजाचा ठोका चुकत होता, पण केवळ देशाचा तिरंगा गाडीवर लावल्यामुळे गाडीला स्पेशल ट्रीटमेंट मिळत होती. कोठेही न अडवता थेट बॉर्डरवर पोहचण्यास २४ तास लागले. ही मुले येथे अगोदर पोलंडच्या सीमेवर गेली होती, मात्र प्रचंड गर्दीमुळे त्यांनी रोमानियाची वाट पकडली.
तर रोमानिया ते दिल्ली आणि तेथून पुणे या प्रवासाचा संपूर्ण खर्च भारत सरकारने उचलला, अशी माहिती एमबीबीएसच्या तृतीय वर्षांत शिक्षण घेणाऱ्या अक्षद दुबे याने दिली.
नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण
दिल्लीला आल्यावर दोन दिवस महाराष्ट्र सदनात अतिशय उत्तम व्यवस्था ठेवण्यात आल्यामुळे आम्ही भारावून गेलो होता, असे सांगताना मलाईका चव्हाण हिचे डोळे पानवले होते. विशेष बाब म्हणजे रोमानिया व इतर बॉर्डरवर जाताना पाकिस्तान, तुर्कीच्या सहकारी विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाडीवर भारताचा झेंडा लावल्याचे ह्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ‘या’ फुटबॉलपटूची भारतीय फुटबॉल संघात निवड !
भांडखोर सुन आहे, मग न्यायालयाचा ‘हा’ महत्वपूर्ण निकाल जरूर वाचा !