जुन्नर : पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी जुन्नर विभाग मंदार जवळे यांच्या सूचनेनुसार ऑपरेशन ऑल आउट राबविले जात असून, नारायणगाव पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील आर्वी केंद्र फाट्याजवळ जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा गँम्लरवर गुन्हा दाखल केला आहे.
जुन्नर : रोहित रघतवान या आदिवासी युवकाचा राजपत्रित अधिकारी पदापर्यंतचा प्रवास
या कारवाईत गँम्लर महेश रमेश गाढवे, अरुण रामकृष्ण असुभे, सीताराम कुंडलिक हानवते, भागेश आत्माराम गाडेकर, विनोद पांडुरंग सरजिने व शिवाजी भिमाजी कांबळे असे सहा गँम्लर मंगळवार दिनांक ७ रोजी जुगाराचे साहित्य जवळ बाळगून रमी नावाचा जुगार पैसे लावून खेळत असतांना पोलिसांना आढळून आले. या कारवाईत पोलिसांना ६ हजार ६८० रुपये रोख व जुगार सहित्य मिळून आले.
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
नारायणगाव पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर २३/२०२२ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये सहाही गँम्लरवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवालदार टाव्हरे व त्यांचे सहकारी करीत आहेत. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अतुल मारुती भेके यांनी फिर्याद दिली होती.
वाईन नव्हे महाराष्ट्राची प्राथमिकता हवी दूध – दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती