जुन्नर / हितेंद्र गांधी : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणात रविवारअखेर केवळ (दि. १०) १२.१९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी प्रकल्पाचे गेल्या १६ मार्च पासून सुरू असलेल्या उन्हाळी आवर्तनासाठी माणिकडोह येथून ६०० क्यूसेक्सने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
कमी पाणीसाठा असलेल्या माणिकडोह धरणांतूनच पाणीउपसा का?
१६ मार्च रोजी कुकडीचं आवर्तन सुरू झाले होते. त्यावेळी डिंभे धरणांत ६.६४ टीएमसी तर माणिकडोह मध्ये ३.७३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. आजमितीस या धरणांमध्ये अनुक्रमे १.२४ व ४.०६ टीएमसी पाणीसाठा आहे. आत्तापर्यंत झालेल्या विसर्गात डिंभे धरणांतून २.५८ टीएमसी तर तळाला घेलेल्या माणिकडोह मधून २.४९ टीएमसी पाणी उचलल्यात आले आहे. त्यामुळे कमी पाणीसाठा असलेल्या माणिकडोह ऐवजी मुबलक पाणीसाठा असलेल्या डिंभे धरणांतून पाणी उचलले जावे, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील शेतकरी करत आहेत.
जुन्नर : घाटघर येथे रात्री भरला रोजगार मेळावा
प्रकल्पात आजमितीस ८.०७ टीएमसी (२६.९८%) पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी आजअखेर ८.५१ (२८.६८%) टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे शिल्लक पाणीसाठा गतवर्षीपेक्षा कमी होत असल्याने यापुढील काळात पाण्याचे नियोजन काटेकोरपणे होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
कुकडी प्रकल्पांतर्गत धरणांमधील आजअखेरचा उपयुक्त पाणीसाठा पुढीलप्रमाणे : (टीएमसी / टक्केवारी) –
डिंभे – ४.०६ / ३२.५५ %
माणिकडोह – १.२४ / १२.१९ %
येडगाव – १.६० / ८२.४४%
पिंपळगाव जोगे – ०.५५ / १४.२९ %
वडज – ०.५४/ ४६.१० %
जुन्नर : महावितरण चे वायरमन व कंत्राटी कर्मचारी यांच्या ‘फ्री स्टाईल’ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल !
दरम्यान कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार अतुल बेनके यांनी माणिकडोह धरणात १ टीएमसी पाणी जुन्नर शहर व परिसरासाठी राखीव ठेवण्याबाबत सूचना केल्या होत्या.
तर सध्या सुरू असलेले उन्हाळ आवर्तन पुढील १०-१२ दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणिकडोह धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. त्यातच प्रचंड तापमान वाढ होत असल्याने धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.
जुन्नर : शिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी संघर्षासाठी तयार व्हा ! – प्रा. संजय साबळे
जुन्नर मध्ये बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे अटकेत, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी