Friday, September 20, 2024
HomeNewsजुन्नर : निमगिरीत राबवली राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

जुन्नर : निमगिरीत राबवली राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

जुन्नर : राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेंतर्गत आरोग्य उपकेंद्र निमगिरीतील न्यु इंग्लिश स्कूल, निमगिरी व परिसरातील अंगणवाडयामध्ये मुलांना एल्बेंडेझाॅल ही जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम राबविण्यात आली.

शाळाबाहय मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात या गोळया देणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, मढच्या आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती सरोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

यावेळी आरोग्य कर्मचारी आरोग्यसेविका एस.एम.बनकर, आरोग्यसेवक व्ही.यू.रासवे, आशा सेविका अलका साबळे, सुनंदा मोरे, जिजाबाई साबळे, फसाबाई केदारी आणि शि‌क्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

जंतनाशक गोळ्यांमुळे रक्ताक्षय (अॅनिमिया) कमी होतो.बालक क्रियाशील होते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शारिरीक, बौद्धिक वाढ सुधारते आणि आरोग्य चांगले राहते, यासाठी आरोग्य विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात आली आहे.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय