Tuesday, July 2, 2024
Homeजुन्नरJunnar : शिक्षक म्हणून नियुक्तीच्या आनंदावर वडिलांच्या मृत्यूने पडले विरजण

Junnar : शिक्षक म्हणून नियुक्तीच्या आनंदावर वडिलांच्या मृत्यूने पडले विरजण

जुन्नर / आनंद कांबळे : शासकीय सेवेत शिक्षक म्हणून नियुक्ती होत असताना त्याचवेळी वडिलांचे निधन झाल्याचा संदेश मोबाईल वर आल्याने जुन्नर तालुक्यातील घाटघर येथील हरिभाऊ विरणक यांच्यावर आनंद साजरा करण्यापूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळल्याची घटना कोल्हापूर येथे घडली. (Junnar)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गुरुवार (दि.२७) रोजी सर्किट हाऊसमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. निवडक शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे पोस्टिंगसाठी बोलावण्यात आले. समुपदेशनाद्वारे त्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील मौजे घाटघर येथील हरिभाऊ दिगंबर विरणक यांचाही समावेश होता. त्यांना नियुक्तीचे पत्र ही देण्यात आले. (Junnar)

मात्र, त्याचवेळी विरणक यांच्या वडिलांचे निधन झाल्याचा संदेश मोबाईल वर आला. शासकीय शिक्षक नियुक्ती चा आनंद आणि लगेचच वडिलांचे छत्र हरपल्याच्या बातमीने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. समुपदेशनासाठी आलेल्या शिक्षकाच्या वडिलांच्या मृत्यूची माहिती कळताच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस तात्काळ सभागृहातून बाहेर आले. त्यांनी शिक्षक विरणक यांचे सांत्वन केले. तसेच त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्याची सूचना प्रशासनाला केली. तसेच विरणक यांना फोन करून, कुठ पर्यंत पोहचलात, प्रवासात काही अडचण असल्यास तातडीने कळवा अशा सूचना देखील केल्या. संकटकाळात आधार देत कार्तिकेयन एस. यांनी दाखविलेल्या माणुसकीने नवनिर्वाचित शिक्षकानाही काही काळ भारावून टाकले.

“कोल्हापूर जिल्हा परिषदेतील नवनियुक्त शिक्षकांची नियुक्ती कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर पार पडली. यावेळी जुन्नर तालुक्यातील घाटघर येथील हरिभाऊ विरणक यांना निवड पत्र देताना त्यांच्या वडिलांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यामुळं मी त्यांना आधार देण्याचं काम केलं. जिल्हा परिषदेकडून कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या अडचणींना धावून जाणं मी माझं कर्तव्य समजतो. “

– कार्तिकेयन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

वडिलांच्या निधनाची बातमी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांना समजताच त्यांनी स्वतः सभागृहाबाहेर येऊन माझे सांत्वन करून धीर दिला. मोठे अधिकारी असूनही आदर्श कुटुंब प्रमुखाप्रमाणे वेळोवेळी फोन करून कोल्हापूर वरून निघाल्या पासून घरी पोहचेपर्यंत माहिती घेऊन धीर दिला.
दुःखाच्या कठीण प्रसंगी काळजी घेऊन धीर देणारे अधिकारी लाभले हे मी माझे भाग्य समजतो.

– हरिभाऊ विरणक, शिक्षक

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय

मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा

T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

India Post : भारतीय पोस्ट मध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय