जुन्नर : ग्रामपंचायत खैरे – खटकाळे (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायतीसाठी येणाऱ्या ‘पेसा ५ टक्के अबंध निधी’ चा गैरवापर करून तो गायब करण्याची घटना २०१७ – १८ या वर्षी घडली आहे. यासंबंधी लळित रंगभूमीचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांनी पुणे जिल्हा परिषदेकडे तक्रार केली. याबाबत ३ वर्षे पाठपुरावा केला; परंतु जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे राज्यपालांकडे तक्रार करावी लागली. राज्यपाल कार्यालयाने या प्रकरणाचे गांभिर्याने लक्षात घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत खैरे – खटकाळे मध्ये २०१७ – २०१८ चा निधी कोणालाही न माहिती करता ग्रामसेवकांने काम केल्याचे दाखवून निधीची फसवणूक केल्याचे समोर आले. जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये फसवणूक आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा देखील दाखल आहे. परंतु या प्रकरणाची केस अद्याप कोर्टात दाखल करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतीचे दप्तर देखील आजतागायत जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन, किसान सभा, मजूर यांची एकत्रित विशेष बैठक संपन्न
राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर जिल्हा परिषदेला जाग आली आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जुन्नर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना कार्यवाही करून निधी मिळवून देण्याबाबत कळवले आहे.
विशेष म्हणजे ‘पेसा अबंध निधी’ फसवणूक प्रकरणी तीन वर्षांपूर्वी जुन्नर पोलीस स्टेशन येथे ग्रामसेवक मधु मंगेश कृष्णा ठेंगिरे व माजी सरपंच छगन गेणू घुटे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामपंचायतीचे दप्तर हे जुन्नर पोलिस स्टेशनला जमा होते. गुन्हा दाखल होऊनही ग्रामसेवकांना सेवेत काम केले जात आहे, असेही डॉ. केदारी म्हणाले.
जुन्नर : हिरडा कारखान्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न !
या प्रकरणात अंदाजे ४ लाख रूपयांचा गैरवापर झाला आहे. तक्रार देऊनही चौकशी पत्र काढण्यापलीकडे जिल्हा परिषदेने काहीच केले नसल्याचा गंभीर आरोप डॉ. केदारी यांनी केला आहे.
आता तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या प्रकरणाची चौकशी करणार का ? ग्रामपंचायत खैरे – खटकाळे चा निधी मिळणार का ? की पुन्हा प्रशासनातील अधिकारी एकामेकांना पाठिशी घालणार ? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या १०० जागांसाठी भरती!
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2022 | तुषार ठिबक सिंचन अनुदान योजना 2022
आयपीएल २०२२ चा लिलाव सुरू असताना अचानक ऑक्शनर ह्युज एडमेड्स कोसळले