Sunday, December 22, 2024
Homeकृषीजुन्नर : माणकेश्वर येथे शेतीदिन कार्यक्रम साजरा !

जुन्नर : माणकेश्वर येथे शेतीदिन कार्यक्रम साजरा !

जुन्नर : माणकेश्वर ता.जुन्नर येथे दि.८ मार्च रोजी  कृषी विभागाअंतर्गत शेतीदिन कार्यक्रम आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत हरभरा पीक काढणी, विक्री व्यवस्थापन व साठवणूक या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, मंडल कृषी अधिकारी डी. एस. जाधव आणि कृषी अधिकारी बापू रोकडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

मोठी बातमी : उद्यापासून लालपरी धावणार? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय !

ऊस, वीज व विमा प्रश्नी किसान सभा मैदानात, 16 मार्च पासून राज्यभर आंदोलन !

या वेळी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक अमोल भालेकर, भारती मडके आणि शैला भालेकर यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माहिती दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून योग्य असे मार्गदर्शन केले.

यावेळी माणकेश्वर गावचे पोलीस पाटील रोहिदास कोरडे, किसान सभा सदस्य कोंडीभाऊ बांबळे, कुकडेश्वर वन धन सदस्य एकनाथ मुंढे, बाळू जाणकु कोरडे, धर्मा कोरडे, लक्ष्मण कोरडे, दीपक शेळकंदे, काशिनाथ बांबळे, पांडुरंग बांबळे, बाळू उतळे, भीमा बांबळे, रामदास लांडे, बबिता बांबळे, पारुबाई कोरडे आदी शेतकरी महिला व पुरुष उपस्थित होते.

तलाठ्यांनो सावधान ! ..अन्यथा घरभाडे बंद करणार

संबंधित लेख

लोकप्रिय