Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरजुन्नर : घाटघर येथे लोकभारती पक्ष शाखा स्थापन

जुन्नर : घाटघर येथे लोकभारती पक्ष शाखा स्थापन

जुन्नर : घाटघर (ता.जुन्नर) येथे शुक्रवारी (दि.११) लोकभारती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन पक्षाचे जुन्नर तालुका अध्यक्ष खालिद पटेल यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.

यावेळी शाखा अध्यक्ष पदी मंगल रढे, उपाध्यक्ष पदी नीता पानसरे, तर सचिव पदी अश्विनी खरात यांची निवड करण्यात आली. 

जुन्नर : राज्यपालांच्या आदेशाने जिल्हा परिषदेला जाग, ग्रामपंचायत खैरे – खटकाळे निधी फसवणूक प्रकरण


मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन, किसान सभा, मजूर एकत्रित विशेष बैठक संपन्न

यावेळी जुन्नर तालुका महिला अध्यक्षा छायाताई उपालकर, जुन्नर शहर महिला अध्यक्षा रिना खरात, कार्यध्यक्ष रफिक तकि, पोलीस पाटील शैला रावते आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी महिलांना राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी व भारतातील थोर महापुरुषांचा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी अविनाश हाडवले, मुस्तफा सय्यद आदींसह महिला उपस्थित होत्या.

जुन्नर : हिरडा कारखान्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न !


संबंधित लेख

लोकप्रिय