Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरजुन्नर : माणकेश्वर येथील नवक्रांती महिला बचत गटाचा जिल्हा पातळीवर गौरव

जुन्नर : माणकेश्वर येथील नवक्रांती महिला बचत गटाचा जिल्हा पातळीवर गौरव

जुन्नर : माणकेश्वर येथील नवक्रांती महिला बचत गटाने गरुड झेप घेत गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर आपल्या कार्यातून नाव उमटवले आहे. नवक्रांती बचत गटाने अर्थकारणाबरोबर स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, व्यवसाय कौशल्य, नैसर्गिक पध्दतीने शेती व्यवसाय तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून गावाचा विकास हे ध्येय उराशी बाळगून अध्यक्षा माधुरीताई सतिश कोरडे पाटील आणि सर्व महिलांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.

आज (दि.१०) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,मुख्य शाखा पुणे येथे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात या महिलांचा गौरव सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या विभागांचे राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिकाताई दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.

जुन्नर : आंबे येथे मनरेगा योजने अंतर्गत आश्रम शाळेच्या क्रीडांगणाच्या कामाला सुरुवात

या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गादे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, स्त्री शक्ती नारी पतसंस्था अध्यक्षा क्रांतीताई शितोळे, उपाध्यक्ष सुनील चांदोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, संचालिका निर्मलाताई जागडे, संचालिका पुजाताई बुट्टे पाटील तसेच सर्व संचालक मंडळ,वरिष्ठ अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.


जुन्नर : माणकेश्वर येथे शेतीदिन कार्यक्रम साजरा !

त्याच बरोबर शिवसेना परिवार यांच्या माध्यमातून सुनीता रोहिदास बोऱ्हाडे यांचे कडून उत्कृष्ट कार्याबद्दल दि.8 मार्च जागतिक महिला दिन या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र आपटाळे येथे  नवक्रांती महिला बचत गटाच्या सर्व महिलांचा गौरव करण्यात आला. या वेळी प्रकल्पस्तरीय सदस्य दत्ताभाऊ गवारी, बन्सी चतुर, सूर्यकांत हांडे, सुरेश जोशी तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


तलाठ्यांनो सावधान ! ..अन्यथा घरभाडे बंद करणार

तसेच जागतिक महिला दिनानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा जुन्नर यांचे कडून माधुरीताई कोरडे यांचा आणि नवक्रांती महिला बचत गटातील सर्व महिलांचा उत्कृष्ट कर्तव्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी संचालिका पुजाताई बुट्टे पाटील व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा जुन्नरचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी तालुक्यातील सर्व महिला वर्ग हजर होते.

नवक्रांती बचत गटाच्या अध्यक्षा माधुरी सतिश कोरडे, सचिव शेवंता काशिनाथ बांबळे, सखुबाई दत्तात्रय लांडे, मनिषा विष्णू कोरडे, सोनाली विठ्ठल लांडे, लहाणाबाई धर्मा कोरडे, यमुना निवृत्ती साबळे, सुनीता रामदास लांडे, जया रोहिदास कोरडे, कमल जाणकू लांडे यांचे संपूर्ण जिह्यातून कौतुक केले जात आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय