Thursday, December 26, 2024
Homeजुन्नरJunnar : उच्छिल येथे 'चिमणीचे संवर्धन करा' उपक्रम

Junnar : उच्छिल येथे ‘चिमणीचे संवर्धन करा’ उपक्रम

Junnar : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथे जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. आज तंत्रज्ञानाच्या युगात चिमणी हा पक्षी नामशेष होत चालला आहे. उन्हाळा सुरू झाला की तापमान वाढत जाते, तसा ह्या पक्षांचा जीव गुदमरतो आज चिमण्या सिमेंटच्या जंगलात बेघर झालेल्या आहेत. घर अंगणात शेताच्या बांधाच्या परिसरात त्यांना निवारा देणे गरजेचे आहे. जुन्या मातीच्या टाकाऊ भांडीकुंड्यामध्ये पाणी ठेवणे गरजेचे आहे. Junnar News

जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून आज आमच्या शाळेत उपक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी चिमणी बद्दल चित्रे रेखाटली, चिमणीबद्दल दैनंदिन जीवनातील आपले स्वतःचे अनुभव कुमारी सुप्रिया बांबळे यांनी सांगितले. स्वतः अनुभव प्रसंग सादरीकरण केले.

जागतिक चिमणी दिनामुळे विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासून पर्यावरण जागृती होण्यासाठी असे विविध उपक्रम राबविणे महत्त्वाचे आहेत. या उपक्रमातून पक्षांविषयी भूतदया करुणा सहानुभूती निर्माण झाली पक्षांवर प्रेम करा हा संदेश विद्यार्थ्यांनी अंगी रुजवला. पक्षी मित्र होऊन पक्षांविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली शेवटी ‘चिमणी वाचवा, चिमणी जगवा’ असे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन पदवीधर शिक्षक सुभाष मोहरे यांनी तर संयोजन शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी केले. तर या उपक्रमात स्मिता ढोबळे, लीलावती नांगरे, आरती मोहरे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

धक्कादायक : ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

संबंधित लेख

लोकप्रिय