Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरजुन्नर : आंबे येथे मनरेगा योजने अंतर्गत आश्रम शाळेच्या क्रीडांगणाच्या कामाला सुरुवात

जुन्नर : आंबे येथे मनरेगा योजने अंतर्गत आश्रम शाळेच्या क्रीडांगणाच्या कामाला सुरुवात

किसान सभेच्या आमरण उपोषणानंतर जुन्नर तालुका प्रशासनाने दिली मनरेगाच्या विविध विकास कामांना गती

जुन्नर : किसान सभेच्या आमरण उपोषणानंतर जुन्नर तालुका प्रशासनाने मनरेगाच्या विविध विकास कामांना गती दिली आहे. आंबे पिंपरवाडी येथे आज (दि.१०) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने (MRGS) अंतर्गत आंबे आश्रम शाळेच्या नवीन क्रिडांगणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

उदघाट्न प्रसंगी किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले, जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात मनरेगाची कामे मोठया प्रमाणात होत आहेत. त्यामध्ये आंबे पिंपरवाडी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत गावात वृक्ष लागवड, पाणंद रस्ते, ही कामे मनरेगा योजनेच्या अंतर्गत झाली आहेत. या कामांमुळे आतपर्यंत आंबे ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा योजनेतून 15 लक्ष रुपये  पेक्षा जास्त निधी मागील 2 वर्षात मजुरांना मिळाला आहे.

ऊस, वीज व विमा प्रश्नी किसान सभा मैदानात, 16 मार्च पासून राज्यभर आंदोलन !

यावेळी बोलतांना सरपंच मुकुंद घोडे म्हणाले, अखिल भारतीय किसान सभा व आंबे पिंपरवाडी ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने मनरेगा योजनेच्या माध्यमातून सातत्याने आंबे पिंपरवाडी ग्रामपंचायती अंतर्गत विविध विकास कामे होत आहेत.

जुन्नर : माणकेश्वर येथे शेतीदिन कार्यक्रम साजरा !

यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विलास डी.साबळे म्हणाले, मनरेगा योजनेच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या क्रिडांगणाचे काम सुरु होत आहे ही शाळेसाठी व आम्हा सर्व शिक्षकांनसाठी आनंदाची बाब आहे. शाळेसाठीचे क्रीडांगण हे गावातील मजुरांच्या मेहनतीतुन तयार होणार आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच हे काम होतं असल्याबद्दल तालुका प्रशासन, किसान सभा, ग्रामपंचायत, सरपंच व मजूरांचे आभार व्यक्त करत आहे.”

क्रिडांगणाच्या काम सुरू झाल्यामुळे पालक, विद्यार्थी  व शिक्षक समाधान व्यक्त करत आहेत. किसान सभेच्या सततच्या पाठपुराव्या मुळे आंबे गावातील लोकांना / मजुरांना पुढील काही दिवस गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने मजु्रांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

मोठी बातमी : उद्यापासून लालपरी धावणार? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय !

मजुरांना गावातच हाताला काम आणि रोजगार मिळाल्याने मजुरांनी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, त्याचबरोबर मनरेगा विभागात काम करणारे ए.पी.ओ दुर्गेश गायकवाड, तांत्रिक अधिकारी जितेंद्र भोर, आंबे गावचे ग्रामसेवक लहू भलिंगे तसेच जुन्नर तालुका रोजगार हमी योजना तालुका समिती सदस्य गणपत घोडे तसेच आंबे गावचे रोजगार सेवक संदिप शेळकंदे या सर्वांचे आभार गावातील मजुरांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आंबे पिंपरवाडीचे सरपंच मुकुंद घोडे, उपसरपंच अलकाताई काठे, किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, किसान सभेचे तालुका समिती सदस्य कोंडीभाऊ बांबळे, ग्राम रोजगार सेवक संदीप शेळकंदे, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विलास डी. साबळे, अधिक्षक दिनेश पाटील, अधिक्षिका श्रीमती. दुर्गा धंदरे, कांबळे सर, साबळे सर, कोकणे मॅडम, दिनेश माळी, गावातील जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग, ग्रामपंचायत सदस्य महिला आणि 19 मजूर उपस्थित होते.

तलाठ्यांनो सावधान ! ..अन्यथा घरभाडे बंद करणार

पंजाब व्यतिरिक्त सगळीकडे भाजप चे कमळ उमलले !

संबंधित लेख

लोकप्रिय