Sunday, June 30, 2024
Homeजुन्नरJunnar : कॉलेज तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून करिअर घडवावे - पोलीस निरीक्षक...

Junnar : कॉलेज तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून करिअर घडवावे – पोलीस निरीक्षक किरण अवचार

Junnar (आनंद कांबळे) : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात २६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. जुन्नर पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण पोलीस दल यांच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर तसेच पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार व इतर पोलीस कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक किरण अवचर म्हणाले ‘२६ जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन सर्वत्र साजरा होत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनाचा आनंद घेत असताना व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे व आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण करून स्वतःचे करिअर घडविले पाहिजे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी वाघमारे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले ‘कॉलेज जीवन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उत्तम आकार देण्याचे काम करते. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन उद्याचे आपले उज्वल भविष्य घडवले पाहिजे व व्यसन व अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा निर्धार करावा.

तसेच यावेळी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी व सध्या जुन्नर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे विद्या पाटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांनी स्वतः च्या क्षमता ओळखून स्वतःला सिद्ध करावे. या कार्यक्रमास विज्ञान विभागप्रमुख प्रा एस एम इंगळे, वाणिज्य विभाग प्रमुख ए पी ढोले तसेच पोलिस कर्मचारी संतोष पठारे, ओंकार ढोकरे, अरुण रहाणे, किसन पोटकुले, दशरथ डगळे, एकनाथ भोईर, प्रशांत भागवत, विद्या पाटेकर, आशुतोष घुले, अमोल कचरे, सायली खैरनार व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. (Junnar)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा के जी नेटके यांनी केले. तर सर्व मान्यवरांचे आभार प्रा शरद मनसुख यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय