Monday, December 23, 2024
Homeग्रामीणजुन्नर : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या उपसरपंचावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

जुन्नर : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या उपसरपंचावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Photo : Ajinkya Gholap / Facebook

जुन्नर : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी खामगांवचे उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजिंक्य घोलप यांच्यावर जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्नर : किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय शेतकरी हिताचा – कृषीभूषण जितेंद्र बिडवई

सविस्तर वृत्त असे की, माणिकडोह कॉलनी येथे मच्छीमारीसाठी जाळ टाकण्याच्या मुद्यावरून  मीटिंग आयोजित करण्यात आली होती, या मीटिंगसाठी संस्थेचे चेअरमन सना दगडू केदार, सेक्रेटरी अंकुश गायकवाड तसेच शिवाजी वाडी रा.खामगाव ता.जुन्नर हे व तेथील 30 ते 40 लोक असे जमलेले होते. त्यावेळी धरणामध्ये मच्छीमारीसाठी जाळ टाकण्याच्या मुद्यावरून उपसरपंच अजिंक्य घोलप व दशरथ भालेकर यांच्यात बाचाबाची चालू झाली. त्यानंतर अजिंक्य घोलप यांनी दशरथ भालेकर यांच्या कानाखाली मारली. दशरथ भालेकरचे व त्यांची भांडणे सोडवण्यासाठी मीटिंगसाठी आलेले सर्वजण यांनी फिर्यादीची भांडणे सोडवली. 

जुन्नर : गणपत घोडे यांची तालुकास्तरीय रोजगार हमी योजनेच्या सदस्यपदी निवड !

त्या भांडणांमध्ये अजिंक्य घोलप यास दशरथ भालेकर हे ठाकर समाजाचे आहे हे माहीत असून देखील आरोपी अजिंक्य घोलप सर्वांसमोर दशरथ भालेकर यांना म्हणाला की, “हे ठाकरडे काय करणार आहे मी बघतो त्यांच्याकडे” असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी माहिती फिर्यादीने दिली आहे.  

आरटीई प्रवेश अर्जासाठी आता 16 फेब्रुवारी पासून ऑनलाइन अर्ज

तसेच बाचाबाची मध्ये दशरथ भालेकर यांचे चुलत भाऊ गुलाब सुका भालेकर यांचा मोबाईल आरोपी अजिंक्य घोलप याने हिसकावून नेला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जुन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. 

या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी श्री पाटील करत आहेत.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण जागांसाठी भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!

संबंधित लेख

लोकप्रिय