जुन्नर : घाटघर (ता.जुन्नर) येथे आज (दि.१०) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर गावातील ग्रामस्थ रोजगारासाठी इतरत्र जात असल्याकारणाने दिवसा उपस्थित राहू शकत नसल्याने बचतगटाच्या महिलांनी रात्र हा रोजगार मेळावा आयोजित केला होता.
जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात तालुका प्रशासन आणि किसान सभेच्या पुढाकारातून अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजनेतून मजूर प्रधान कामे सुरू आहेत. घाटघर गावांमध्ये अद्याप कोणतेही काम सुरू नसल्याने आणि रोजगारासाठी इतरत्र जावे लागत असल्याने महिलांनी एकत्र येत मेळाव्याचे आयोजन केले होते.
जुन्नर : शिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी संघर्षासाठी तयार व्हा ! – प्रा. संजय साबळे
यावेळी मार्गदर्शन करताना किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे म्हणाले, “आपण इतरत्र रोजगारासाठी जाण्यापेक्षा गावातच रोजगार हमी योजनेतून गावविकासाची कामे करू शकते. ज्यातून गावाचा आणि कुटुंबाचा शाश्वत विकास होणार आहे. जल, जंगल आणि जमीनीचे संवर्धन करण्यासाठी रोजगार हमी योजना महत्वपूर्ण आहे. त्यासाठी गावातील ग्रामपंचायतीमध्ये कामाची मागणी केली पाहिजे. किसान सभा काम मिळवून देण्यासाठी सहकार्य करेल.” यावेळी रोजगार हमीतून काम करण्यास तयार असल्याचे महिलांनी सांगितले. उसरान गावचे रोजगार सेवक नारायण वायाळ, एसएफआय चे राजेंद्र शेळके, बालकृष्ण यांनी देखील संबोधित केले. पिलाजी शिंगाडे यांनी आभार मानले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या नंदाताई पानसरे, गणू डामसे, बचत गट अध्यक्षा मंगल रढे, बाळु घोयरत, शिवाजी शिंदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
दूध एफ.आर.पी. साठी आता राष्ट्रीय स्तरावर संघर्ष – संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय
विशेष लेख: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले