नाशिक (सुरगाणा) : युजीसीने जून २०२१ मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत जयवंत चव्हाण हे मराठी विषयात उत्तीर्ण झाले आहेत. युजीसीकडून देण्यात येणारी ज्युनियर रिसर्च फेलोशिप ही त्यांनी मिळवली आहे.
त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विषयातून एमए (MA) चे शिक्षण घेतलं आहे. आणि सद्यस्थितीत ते पुणे विद्यापीठात ‘नंदुरबार जिल्ह्यातील लोकसाहित्याचा व लोककलाचा अभ्यास’ या विषयावर पीएचडी करत आहेत.
अभ्यास आणि संघर्ष याची योग्य सांगड घालत प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
स्वप्निल इदे यास ज्यूनिअर रिसर्च फेलोशिप
जुन्नर : स्नेहल साबळे हिचे UGC – NET परीक्षेत यश
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण