Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:मोशीत (दि.16 डिसेंबर रोजी)शहरातील सर्व सहकारी गृहरचना संस्थाचे महास्नेहसंमेलन, समस्या व आव्हानांवर...

PCMC:मोशीत (दि.16 डिसेंबर रोजी)शहरातील सर्व सहकारी गृहरचना संस्थाचे महास्नेहसंमेलन, समस्या व आव्हानांवर होणार ‘विचार मंथन’

सोसायटीधारकांसाठी महास्नेहसंमेलन : फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांची माहिती

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:पिंपरी-चिंचवड शहरात 6 हजाराहून अधिक सहकारी गृह रचना संस्था आहेत.या सर्व सहकारी गृह रचना संस्थांना अनेक अडचणींना,समस्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.या सर्व आव्हानांबाबत साधक-बाधक चर्चा करण्यासाठी तसेच सोसायटी फेडरेशनची सोसायट्यांसमोरील आव्हान, समस्या बाबत फेडरेशनची असणारी भविष्यातील भूमिका याबाबत फेडरेशन मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोसायटीधारकांना एकसंघ करून सर्व सोसायटी धारकांच्या ऐक्यासाठी भविष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना करावयाच्या नियोजनाबाबत सदर महास्नेहसंमेलन मेळाव्यामध्ये चर्चा आणि दिशा ठरवण्यात येणार आहे,अशी माहिती चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली.

चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून येत्या शनिवारी, दि. 16 डिसेंबर रोजी, साधुराम गार्डन मंगल कार्यालय, नाशिक- पुणे हायवे,साईनाथ हॉस्पिटल समोर मोशी या ठिकाणी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व सोसाट्यांमधील सर्व सदस्यांसाठी महास्नेहसंमेलन आयोजित केलेले आहे.

संजीवन सांगळे म्हणाले की,सदर महास्नेहसंमेलन हे सर्व सोसाट्यांमधील सर्व सदस्यांसाठी त्यामध्ये लहान मुले, महिला भगिनी, ज्येष्ठ सदस्य,इतर सर्व सदस्य या सर्वांसाठी हे स्नेहसंमेलन असणार आहे. सदर महास्नेहसंमेलनामध्ये सर्व सदस्यांसाठी करमणूक म्हणून गाण्यांचा कार्यक्रम आर्केस्ट्रा ठेवण्यात आलेला आहे लहान मुलांसाठी खेळण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.सर्व उपस्थित सदस्यांसाठी रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केलेली आहे.तसेच सदर महास्नेहसंमेलनासाठी उपस्थित असणाऱ्या सोसायटी धारकांच्या विविध समस्या मांडण्यासाठी एक ड्रॉप बॉक्स या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये परिसरातील सदस्य आपल्या भागातील अडी अडचणी समस्या ठेवू शकतात. यावर या महास्नेहसंमेलनानंतर पाठपुरावा करून या सर्व समस्या सोडवल्या जातील..
तरी पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच सोसायटीमधील सर्व सदस्यांनी सदर फेडरेशनच्या महास्नेहसंमेलनास उपस्थित राहावे. असे फेडरेशन कडून आव्हान करण्यात येत आहे..

अभेद्य एकजुटीचा निर्धार आहे

सर्व सोसायटीधारकांना एकत्र करून एका छताखाली आणणे. सर्वांना एकत्र करून आपल्या सर्वांच्या समोर असणारी अनेक आव्हाने अडचणी,समस्या याबाबत सर्वांना मार्गदर्शन आणि आपल्या फेडरेशनची भविष्यात असणारी भूमिका या महा स्नेहसंमेलनात जाहीर केली जाणार आहे. सर्व सोसायट्यांमधील सर्व सदस्यांना सहकुटुंब सहपरिवार एकत्र आणून विचाराची देवाण-घेवाण आणि सहपरिवार आनंद साजरा करणे हा या महासंमेलनाचा उद्देश आहे.तरी माझी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटीधारकांना विनंती आहे.आपल्या सर्वांच्या ऐक्यासाठी,आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी आपण सर्वानी या महास्नेहसम्मेलनास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित रहावे.

संजीवन सांगळे, अध्यक्ष चिखली – मोशी -पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन..

सोसायटी सदस्यांच्या समस्या निवारणासाठी विचार मंथन

शहरांमधील बऱ्याच सोसायट्यांमधे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे सदस्य राहतात,त्यामध्ये वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, व्यावसायिक, शास्त्रज्ञ असे प्रतिभा असणारे सदस्य आपल्या सर्व सोसायट्यांमधे आहेत.या सर्वांना एकत्र करून या सर्वांच्याकडे असणाऱ्या प्रतिभेचा,कौशल्याचा आपल्या सर्व सोसायटीधारकांना कसा फायदा करून घेता येईल आणि आपल्या सर्वांची कसे प्रगती करता येईल.याबाबत या महा स्नेहसंमेलनामध्ये चर्चा विनिमय करण्यात येणार आहे.
– प्रा. प्रताप बामणे, कार्यकारी अध्यक्ष-चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन.

संबंधित लेख

लोकप्रिय