मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा घट होताना दिसत आहे, महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १५ हजार २५२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून ७५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३० हजार २३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
बांधकाम कामगारांसाठी खुशखबर : अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी
पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी आढळत आहे. पुणे शहरात गुरुवारी १० हजार ५३६ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी २ हजार १४१ रुग्ण कोरोनाबधित असल्याचे निदान झाले. सध्या पुणे शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २२ हजार २६ इतकी झाली असून, यापैकी केवळ ४.५८ टक्के बाधित हे रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर मुंबईत गुरुवारी ८२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात सध्या १ लाख ५८ हजार १५१ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण असून ओमायक्रॉनचे १४०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत ३३३४ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले होते त्यापैकी १९२९ रुग्ण बरे झाले आहेत.
घरकुलच्या प्रतिक्षेत असलेल्या ‘ड’ यादी धारकांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेपर्यंत मिळणार १०० टक्के मंजूरी
कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असल्याने राज्य सरकारने देखील निर्बंध मागे घेण्यास सुरूवात केली आहे, त्यामुळे नागरिकांना देखील दिलासा मिळत आहे.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा