Monday, June 24, 2024
Homeताज्या बातम्याBrijbhushan singh : कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात...

Brijbhushan singh : कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

Brijbhushan singh : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित केल्यानंतर भाजप नेते ब्रिजभूषण सिंग मंगळवारी प्रथमच राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर झाले. मागील सुनावणीत, राऊस अव्हेन्यू न्यायालयाने कलम 354 (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळजबरी) कलम 354-ए (लैंगिक छळ) आणि कलम 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोप निश्चित केले. भाजप नेते आणि WFI चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan singh) यांच्यावर खटला चालणार आहे.

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह मंगळवारी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर झाले. न्यायालयाने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप वाचून दाखवले. यानंतर न्यायालयाने ब्रिजभूषण यांना विचारले की, ते त्यांच्यावरील आरोप मान्य करतात का? त्यावर ब्रिजभूषण यांनी, आपण कोणतीही चूक केलेली नाही आणि या प्रकरणात आपण खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे सांगितले.

Brijbhushan singh आरोप स्वीकारण्यास नकार

ब्रिजभूषण सिंह यांनी चूक मान्य करण्यास नकार दिला आणि त्यांनी कोणतीही चूक केली नसेल तर ती मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगितले. ब्रिजभूषण सिंग यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी न्यायालयाने दाखल केलेले आरोप स्वीकारण्यास नकार दिला.

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ब्रिजभूषण यांचे सहकारी विनोद तोमर यांच्यावरही खटला चालणार आहे. ब्रिजभूषण यांचे सहकारी विनोद तोमर यांनीही त्यांच्यावरील आरोप मान्य करण्यास नकार दिला आहे. विनोद तोमर म्हणाले की, आमच्याकडे पुरावे आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय