पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : संपूर्ण पवना नदी फेसाळलेल्या स्वरूपात दिसत आहे.मागील काही वर्षात नदी सतत प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे नागरिकांचे व लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणी वरती आला आहे, असे मत आदमी पार्टी चे डॉक्टर आघाडी प्रमुख डॉ. प्रशांत कोळवले यांनी व्यक्त केले.
थेरगाव येथील केजुबाई बंधारा या ठिकाणी पवना नदीला बर्फाळ नदीचे स्वरूप आले आहे. अवघी नदी फेसाळलेल्या स्वरूपात दिसत आहे. महानगरपालिकेकडे सतत तक्रार करून देखील यावर अजून तोडगा निघाला नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पिंपरी-चिंचवडमधून वाहणारी पवना नदी ही आधी जलपर्णीमुळे तर आता फेसाळलेल्या केमिकल युक्त पाण्यामुळे चर्चेत आलेली आहे. पवना नदीची ही स्थिती कोणामुळे झाली? याला कोण जबाबदार आहे? याचे मात्र उत्तर काही मिळत नाही आहे. नागरिकांच्या आरोग्य सोबत खेळण्यासारखा हा प्रकार आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यावर कायमस्वरूपी कधी तोडगा काढणार? अशी मागणी डॉ. प्रशांत कोळवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.





