Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

इगतपुरी : कचरवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

---Advertisement---

---Advertisement---

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील कचरवाडी येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांना संदीप दिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू वाटप करण्यात आले. 

कचरवाडी गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आहे. लॉकडाऊन मुळे शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वेळेवर मिळत नसल्याने संदीप दिवटे यांनी एक निश्चय केला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या, पेन ,पार्टी ,पेन्सिल इत्यादी गोष्टी वाटप करण्यात आल्या. 

यावेळी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मदत करता येईल हे संदीप दिवटे यांनी जाणले आणि त्यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना हातभार लावण्याचे ठरवले. या कामाबद्दल संदीप दिवटे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संदीप दिवटे म्हणाले, विनाकारण केलेला खर्च हा व्यर्थ खर्च होतो, म्हणून समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे प्रत्येकाच्या हातून समाजसेवा झाली पाहिजे. याची जाणीव ठेवून सर्वांनी समाजासाठी कार्य केले पाहिजे. या निश्चयाने जिल्हा परिषद शाळा कचरवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे शिक्षक भांगरे सर, राम साबळे सुनील कचरे, अमोल कोरडे, भाऊराव कचरे आदी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles