Thursday, April 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बाळामध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक समस्या असल्यास बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा – डॉ. काश्मिरी बडबडे

वात्सल्य मदर ॲण्ड चाईल्ड केअर आयोजित बालविकास कार्यशाळा संपन्न

---Advertisement---

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : आई, बाबांनी बाळाचे संगोपन करताना काही बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बाळाची बौद्धिक क्षमता, बुद्धी विकास हा पहिल्या दोन वर्षांमध्ये होतो. बाळाच्या चालणे, बोलणे, ओळखणे या बाबी पहिल्या वर्षात झाल्या पाहिजेत. तसे होत नसेल तर बाळाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासात काही समस्या असू शकतात. अशा वेळी पालकांनी विनाविलंब बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू केले पाहिजेत. उपचाराला विलंब म्हणजे परिणामकारकता कमी असे मार्गदर्शन बालरोग तज्ज्ञ डॉ. काश्मिरी बडबडे यांनी केले.

ऑटो क्लस्टर चिंचवड येथे भोसरी येथील वात्सल्य मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल तर्फे पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांसाठी बालविकास कार्यशाळेचे आयोजन केले होते.

---Advertisement---

यावेळी वात्सल्य रूग्णालयाचे संचालक डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. माधुरी आल्हाट, डॉ. संदीप कवडे, डॉ. शंकर गोरे, डॉ. अर्चना कवडे तसेच डॉ. स्वाती म्हस्के, डॉ. श्रद्धा चौधरी, डॉ. सारिका भोईर, डॉ. हेमा चंद्रशेखर, डॉ. बागेश्री देवकर, डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. विकास पाटील, डॉ. अरुण सोळसे, डॉ. महेश शेठे, डॉ. कल्याणी पेठकर आदी उपस्थित होते.

किशोरवयीन मुलांचे संगोपन करणे, त्यांना समजून घेणे महत्त्वाचे असते. पालकांनी मुलांसमोर आपले वर्तन बोलणे, आचरण अनुकरणशील ठेवावे. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर ठेऊ नये. मुलं निसर्गत: घडत असतात. आपण त्यांना सहाय्यभूत ठरतील अशा गोष्टी कराव्यात. मूलांचे पालक बना मालक नाही असे संयोजक बालरोग तज्ज्ञ डॉ.संदीप कवडे यांनी सांगितले. 

मानसोपचार तज्ज्ञ कल्याणी पेटकर, डॉ. अर्चना कवडे, डॉ.शंकर शोरे, डॉ.बागेश्री देवकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. रोहिदास आल्हाट यांनी स्वागत, प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूचसंचालन तर डॉ. अर्चना गोरे यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles