नवी दिल्ली : देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे डिसेंबर-जानेवारीमध्ये सोनीपत- जिंद दरम्यान 90 किमी धावणार आहे. देशातील ही पहिली प्रदूषणमुक्त प्रवासी रेल्वे असणार आहे. डिझेल इंधनामुळे रेल्वे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित करते. (Hydrogen train)
जिंद रेल्वेस्थानकावर 3000 किलो हायड्रोजन साठवण्यासाठी प्लँट तयार करण्यात येत आहे. रेल्वेला दर तासाला 40 हजार लिटर पाणी लागणार आहे.
भारतीय रेल्वेचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग हायड्रोजन रेल्वे साठी संशोधन करत आहे. भारतीय रेल्वेने सध्याच्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (DEMU) ट्रेनमध्ये हायड्रोजन इंधन सेल स्थापित करण्यासाठी पायलट प्रकल्प मंजूर केला आहे. या ट्रेनचा किमान वेग ताशी 105 किमी असणार आहे. (Hydrogen train)
माथेरान हिल रेल्वे, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, कालका-सिमला रेल्वे, कांगडा व्हॅली, निलगिरी माउंटन रेल्वे हेरिटेज आणि माउंटन मार्गांवर ३ वर्षांत ३० हायड्रोजन रेल्वे सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. चाचण्या झाल्यानंतर डिसेंबर 2024 / जानेवारी 2025 मध्ये हायड्रोजन ट्रेन धावणार आहेत.
झीरो कार्बन पर्यावरण पूरक ट्रेन असणार आहेत. कारण हायड्रोजन ट्रेन कार्बन उत्सर्जन करत नाहीत. पाण्यापासून हायड्रोजन निर्मिती करून पाइपद्वारे हायड्रोजन गॅस ट्रेनमध्ये भरला जाणार आहे. पाणी अणूरेणूचे संयुग आहे.
जगातील पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन जर्मनीमध्ये लॉन्च झाली. स्वीडन, चीन, जर्मनी आणि फ्रान्स नंतर हायड्रोजन रेल्वे चालवणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरणार आहे.