मधुकर बच्चे युवा मंच व वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने आयोजित घरगुती गौरी -गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – रविवार 20/10/2024 सायं चिंचवड येथे पार पडला. या स्पर्धेत एकूण 210 लोकांनी सहभाग घेतला. वुई टुगेदर फाउंडेशनचे सल्लागार व मधुकर बच्चे युवा मंचचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी गौरी गणपती उत्सवात सजावट स्पर्धा चिंचवड येथे आयोजित केल्या होत्या. सलग 12 वर्षे हा सांस्कृतिक उपक्रम राबवला जात आहे. या स्पर्धांमध्ये 200 हून जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (PCMC)
गौरी आणि गणपती या निसर्गाशी संबंधित देवता
भारतीय सण सांस्कृतिक, सामाजिक तसेच आध्यात्मिक दृष्ट्याही परिपूर्ण आहेत. गणेश उत्सव अतिशय लोकप्रिय उत्सव आहे. गौरी आणि गणपती या निसर्गाशी संबंधित देवता आहेत, पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करताना सजावट स्पर्धेतून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश दिले जातात. या उत्सवाच्या माध्यमातून युवक युवती आणि महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली. असे मधुकर बच्चे यांनी बक्षीस वितरण समारंभात सांगितले.
गौरी व गणपती सजावट साठी एकूण अनुक्रमे चार चार बक्षीसे देण्यात आली. (PCMC)U
गौरी सजावट
प्रथम क्रमांक : शोभा लुकर
द्वितीय : अनिता भारुळे
तृतीय : मेघा जाधव
चतुर्थ : पूजा जैन
गणपती सजावट
प्रथम क्रमांक : पृथ्वीराज मोरे
द्वितीय : दिलीप चक्रे
तृतीय : चंद्रशेखर पगार
चतुर्थ : ऋषिकेश वाळुंज यांना अनुक्रमे बक्षिसे मिळाली.
तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यावेळी वुई टुगेदर फाउंडेशनचे संस्थापक क्रांतीकुमार कडुलकर, भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, भाजपा नेते नंदू भोगले, भाजपा ओबीसी आघाडी नेत्या सोना गडदे, दारासिंग मन्हास आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
वैशाली देशमाने या योगाचार्य म्हणून चिंचवड मध्ये परिचित आहेत, तसेच बाबा रामदेव यांनी त्यांचा व त्यांच्या साधकांचा गौरव केला आहे. त्यांना अनेक मेडल, पुरस्कार मिळाले आहेत, अशा वैशाली देशमाने यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच अत्यंत पार्दर्शक परीक्षण केले, असे परीक्षक मंगला डोळे -सपकाळे, अर्चना बच्चे, जयंत कुलकर्णी यांचाही संयोजकाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
गणेश बच्चे, राजू कोरे, पोपट बच्चे, रोहिणी बच्चे, अर्चना बच्चे, काजल बच्चे, अक्षय गारगोटे, असावरी बच्चे, आकाश खिल्लारे, आदिनी कार्यक्रमास पूर्ण योगदान दिले व कार्यक्रम यशस्वी करण्यास मोठा सहभाग घेतला.
उपस्थिता मधून लक्की ड्रॉ काढण्यात आला. काकडे पार्क मधील 75 वर्ष असणाऱ्या पिंगळे आज्जी यांना पैठणी मिळाली.
जयंत कुलकर्णी, रविंद्र काळे, दिलीप चक्रे, श्रीरंग दाते, सदाशिव गुरव, शंकरराव कुलकर्णी, दारासिंग मन्हास, दिलीप पेटकर, क्रांतीकुमार कडुलकर, गुरूराज फडणीस, राजेश डोळे, दिनेश भारुळे, सिद्धू लोणी, कमल साहि, मच्छिन्द्र थोरवे, सरिता कुलकर्णी आदिनी या उपक्रमात अथक परिश्रम घेतले.
मधुकर बच्चे यांनी आपल्या देशातील दानशूर, महान उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा यांच्या विषयी आठवणीना उजाळा देऊन रतन टाटाना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.
दारासिंग मन्हास यांनी आभार मानले. आदर्श शिक्षिका मंगला डोळे – सपकाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.