Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

HSC Exam : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

HSC Exam, दि. २४ : फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ मे पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

---Advertisement---

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ट न झालेले), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) सोमवार २७ मे पासून शुक्रवार ७ जून २०२४ या कालावधीत नियमित शुल्कासह भरता येणार आहेत. तर विलंब शुल्कासह अर्ज ८ जून ते १२ जून २०२४ या कालावधीत भरता येतील.

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख ३१ मे ते १५ जून २०२४ अशी असून उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार १८ जून २०२४ अशी आहे.

---Advertisement---

HSC Exam

पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच ती भरावीत. आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन

ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!

मोठी बातमी : डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या

काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

Pune : पुणे येथे नोकरीची संधी; आजच करा ऑफलाईन अर्ज!

मोठी बातमी : MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा

ब्रेकिग : 10 वीच्या निकाल कधी लागणार ?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मोठी बातमी : 2010 पासूनचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार

---Advertisement---

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles