Friday, March 14, 2025

साताऱ्यातील या संघटनांनी केली; राज्यातील जातीय हत्या, हल्ले व वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची मागणी.

           

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

प्रतिनिधी :- राज्यातील जातीय हत्या, हल्ले व  वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची मागणी साताऱ्यातील शिवांतीका सामाजिक संस्था, क्रांति थिएटर, संभाजी ब्रिगेड, वीर लहुजी वस्ताद साळवे सामाजिक संस्था, वीर भगत सिंग विचार मंच तथा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती समारोह समिती, हिंदू-मुस्लिम भाईचारा समिती या संघटना आणि संस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

            पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ख्याती असणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांवर जातीय कारणातून जातीय हत्या, हल्ले व  वाढत्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागपूर येथील, नरखेड ता पिंपळधारा गावातील बौद्ध तरुण अरविंद बनसोड यांचा २७ मे २०२० रोजी संशयास्पद मृत्यू झाला.सदरील सर्व प्रकरणाचा तपास CID कडे सोपविण्यात यावा व आरोपीविरुद्ध जातीवाचक शिविगाळ, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये कलमे व हत्या प्रकरणी ३०२ चे कलम लावून अटकपूर्व जामीन नामंजूर करून अरविंद बनसोड यांना न्याय द्यावा.

             

           तसेच पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या २० वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.सदरची घटना ही अत्यंत निंदनीय व संपूर्ण महाराष्ट्राच्या थोर व वैचारिक परंपरेला काळिमा फासणारी आहे.

        या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने मयत तरुणांच्या कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे. पिडीत तरुणांच्या कुटूंबियांस तात्काळ आर्थिक मदत दयावी. तसेच वरील दोन्ही प्रकरणात आरोपींना मृत्यू दंडाची शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

            यावेळी शिवांतीका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश दुबळे, माजी नगरसेवक तथा क्रांति थिएटरचे अध्यक्ष अमर गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश चोरगे, वीर लहुजी वस्ताद साळवे सामाजिक संस्थेचे किशोर गालफाडे, वीर भगत सिंग विचार मंचचे अध्यक्ष कॉम्रेड उमेश खंडूझोडे, हिंदू-मुस्लिम भाईचारा समितीचे आदिल शेख आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles