Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

चिंचवड मध्ये पोलीस प्रशासन व ग्राम रक्षक दलातील कर्मचाऱ्यांचा सन्मान.

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : गजानन सत्संग मंडळाचे वतीने चिंचवड येथे नुकतेच गजानन महाराज मंदिरात प्रगट दिनी आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या उत्सवासाठी चिंचवड पोलिस स्टेशनचे अंतर्गत KTTF आणि ग्राम रक्षक दलाचे सदस्य यांनी बंदोबस्ताचे कार्य केले.या सामाजिक कार्यात सहभागी झाल्याबद्दल चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांचे संकल्पनेतून सहभागी पोलिस मित्रांचा आणि सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या सदस्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम चिंचवड पोलिस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता.

---Advertisement---



या कार्यक्रमास चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा झडते उपस्थित होते. गजानन सत्संग मंडळाचे उपाध्यक्ष किशोर कदम, विश्वस्त सचिन बलकवडे, माधव डबीर तसेच KTTF चे अध्यक्ष अशोक तनपुरे कार्याध्यक्ष विजयकुमार अब्बड उपस्थित होते. या कार्यक्रमात ४८ सदस्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शांतता समितीचे सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.



किशोर कदम, अशोक तनपुरे यांचे हस्ते खराडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला. किशोर कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने गजानन सत्संग मंडळाचे विश्वनाथ धनवे, सचिव प्रताप भगत, महिला सेवेकरी रेखा गोखले आणि अन्य विश्वस्त यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिक्षा झडते यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन एल.आई. बी.चे सागर आढारी, सुभाष मालुसरे, सतीश भारती यांनी केले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles