मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने विकास पाठक याला जामीन मंजूर केला आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यभरात दहावी-बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याने विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता.
हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या १३ महिलांचा विहिरीत पडून मृत्यू, गावावर शोककळा
यानंतर हिंदुस्थानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते, त्यावेळी त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावणी, त्यानंतर पुन्हा एक दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती. नंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अखेर मुंबई सत्र न्यायालयाने हिंदुस्तानी भाऊला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
सत्र न्यायालयाने त्याला ३० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेसह एक किंवा दोन हमीदार देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.
LIC – IPO : मोदी सरकार सोन्याच अंडं देणारी कोंबडी विकत आहे, कर्मचारी संघटनांचा आरोप
राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, घेतले “हे” महत्वाचे चार निर्णय