कोल्हापूर : गायरान जमिनीच्या न्यायासाठी २० जुलै २०२३ रोजी वंचित बहुजन आघाडी आघडीचा मुंबई येथे मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे .त्या मोर्च्याच्या तयारीसाठी कोल्हापूर येथून मोठ्या प्रमानात कार्यकर्ते जाणार आहेत. त्याची तयारी कोल्हापूर येथे कार्यकर्ते करीत आहेत त्यासाठी शहरभर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बैठका होत आहेत. बैठकीस युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलींद सनदी , जिल्हा महासचिव उत्तर सिद्धार्थ कांबळे, शहराध्यक्ष मिलिंद पोवार, यांनी नियोजनाचे मार्गदर्शन केले .
महिला आघाडी अध्यक्षा वासंती म्हेतर, महिला आघाडी महासचिव भाग्यश्री ज्ञानवंशी, पन्हाळा तालुका अध्यक्ष दामाजी जाधव, शिरोळ तालुका अध्यक्ष संदिप कांबळे, हातकनंगले तालुका अध्यक्ष अश्पाक देसाई, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे के एल भारती सह जिल्ह्यातील विविध विंग्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठक अतुल बहुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. यावेळी वरिल पदाधिकार्यांसह अन्य कार्यकर्ते ही उपस्थितीत होते. युवक आघाडीचे नितीन कांबळे, दशरथ कांबळे, जिल्हा कमेटीचे प्रकाश कांबळे कोषाध्यक्ष, शिरोळ तालुका कमेटीचे विश्वास शिंगे ,उदय कांबळे, अमित नागटिळे, विद्याधर कांबळे हे ही उपस्थित होते.
हिमाचल मध्ये पावसाचा कहर, जुना पूल कोसळला , 5 ठार
कडूस गोहत्येच्या निषधार्थ आळंदीत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद
रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

