‘ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ’ विरंगुळा केंद्र येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
पिंपरी चिंचवड : चिंचवड महात्मा फुलेंनगर येथे जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ‘ओमशांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ’ व ‘ब्लू बेल प्लस हीरींग अँड स्पीच सेंटर संयुक्त वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन १२ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंत कन्हेरे, प्रमुख अतिथी म्हणून नेत्ररोग तज्ञ डॉ.चिन्मय खराडे व प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ.सुरेश सिद व डॉ.योगेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते सचिन सानप, मनीषा गटकळ, ज्ञानेश्वर नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजव्यवस्थेला न घाबरता आजच्या साहित्यिकांनी खरे लिहिले पाहिजे – डॉ. विश्वास मेहेंदळे
महात्मा फुले यांनी समतेची बीजे रोवली – नितीन पवार
अध्यक्षस्थानावरून बोलताना यशवंत कन्हेरे यांनी पर्यावरणाचे रक्षण केले तर आपल्याला आरोग्य सांभाळता येईल असे सांगितले.
डॉ.स्वप्निल फुगे यांनी मधुमेह आणि रक्तदाब यांची कारणे व उपचार याबाबत मार्गदर्शन केले. जीवनशैली योग्यरित्या अवलंबली तर मधुमेह आणि उच्च रक्तदाब यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येते असे सांगितले.
महावितरण चे वायरमन व कंत्राटी कर्मचारी यांच्या ‘फ्री स्टाईल’ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल !
इम्रान खान यांना धक्का ; “हे” झाले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास सोहोनी यांनी केले. संचालन शिवानंद चौगुले यांनी केले. आभार नारायण धकाते यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद परिसरातील नागरिक उपस्थित होते.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच कान, नाक, घसा, डोळे तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे अल्पदरात वैद्यकीय साहित्य देखील उपलब्ध करून देण्यात आली होती.
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
या शिबिराचा लाभ १०० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला. आरोग्य शिबिरासाठी ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान’चे कार्यकर्ते व स्वामी समर्थ मंगल केंद्र यांनी परिश्रम घेतले.
– क्रांतिकुमार कडुलकर