मुंबई : उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उर्फी जावेद हिला थेट जीवे मारण्याच्या देखील धमक्या दिल्या जातात. तरीही वेगवेगळे लूक करत ती चाहत्यांना थक्क करत असते. सध्या ती पुन्हा एकदा तिच्या नव्या लुकमुळे चर्चेत आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये टोमॅटोचे भाव वाढले आहेत. याचा फायदा घेत उर्फी जावेदने आपला नवा लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या शेअर केलेल्या फोटोंमुळे उर्फी जावेद पुन्हा चर्चेत आली आहे. उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एक अत्यंत खास गोष्ट आहे. या फोटोमध्ये उर्फी जावेद हिच्या हातामध्ये चक्क टोमॅटो दिसत आहे. या फोटोंसोबतच उर्फी जावेद हिने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

उर्फीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि वन साइट क्रॉप टॉप परिधान केला आहे. तसेच ते टोमॅटो खातानाही दिसत आहे. या सोबतच उर्फीने चक्क टोमॅटोचे कानातले घातले आहेत. तिने कानात घातलेले टोमॅटो हा सध्या चर्चेचा विषय ठरला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टला “टोमॅटो आता नवीन सोनं आहे” असं कॅप्शनदेखील उर्फीने दिले आहे. अनेकजण उर्फी जावेद हिच्या या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत.
दरम्यान, अभिनेता सुनील शेट्टी हा म्हणाला होता की, एक अभिनेता असल्याने टोमॅटोच्या वाढलेल्या भावाचा मला काहीच फरक पडत नाही, असे अजिबात नाहीये, मलाही फरक हा पडतो. आमच्या किचनमध्ये आम्ही टोमॅटो कमी वापरण्यास सुरूवात केली आहे.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर
ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट
विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव
ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून
नोकरीच्या अधिक बातम्या वाचा :
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज
ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज
NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज