Saturday, December 21, 2024
Homeराष्ट्रीयभारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तचे गुगलचे खास डूडल पाहिले का?

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तचे गुगलचे खास डूडल पाहिले का?

मुंबई : देशभरात भारताचा ७३ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गुगलने देखील भारताला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने खास डूडल बनवून भारताच्या संस्कृतीची आणि परंपरेची झलक दाखवली आहे. २६ जानेवारी रोजी जगाला भारताचा सांस्कृतिक वारसा, लष्करी सामर्थ्य आणि विकासाची झलक दिसते, जी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. याला आणखी खास बनवत गुगलने डूडलमध्ये उंट, हत्ती, घोडा, ढोलक तिरंग्याच्या रूपात सादर केले आहेत. 

दरम्यान, गेल्या वर्षी ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने आपल्या डूडलमध्ये देशातील अनेक संस्कृतींची झलक सादर केली होती.

संबंधित लेख

लोकप्रिय