Thursday, January 9, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडव्हीडिओ : हातगाडी, स्टॉल धारकांचे महानगरपालिकेवर आंदोलन

व्हीडिओ : हातगाडी, स्टॉल धारकांचे महानगरपालिकेवर आंदोलन

फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा, अन्यथा बेमुदत उपोषण

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून पिंपरी-चिंचवड शहरातील आठ ही प्रभागातून गोरगरीब पथारी, हातगाडी, स्टॉलधारकावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असून यांचे साहित्य जप्त केले जात आहे. आयुक्तांकडून फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही आणि श्रीमंताच्या गाड्यांना आखून जागा दिली, तशीच गरिबांच्या हातगाडी, स्टॉल साठी जागा द्या या मागणीसाठी व फेरीवाला कायदा आमंलासाठी नॅशनल हॉकर फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आले.

कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या मार्गदर्शनात झालेल्या आंदोलनामध्ये कार्याध्यक्ष राजू बिराजदार, प्रदेश संघटक अनिल बारवकर, इरफान चौधरी, मनपा सदस्य राजेन्द्र वाघचौरे, ओमप्रकाश मोरया, चंद्रकांत कुंभार, अरुणा पाटिल, संभाजी वाघमारे, यासीन शेख, बालाजी लोखंडे, प्रदीप कोंगे, मुमताज शेख, राजेश माने, सुरेश देडे, प्रशांत गवळी, शमा सय्यद आसिफ शेख, राजू बोराडे, बाबुराव कस्तुरे, युनूस शेख, संदीप भोसले, मन्सूर मुजावर, अजित शेळके, दादा भानवसे आदीसह महिला-पुरुष विक्रेत्यानी शहरातील विविध भागातून येऊन सहभाग नोंदवला.

महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, ४ श्रमसंहितेच्या विरोधात ५० हजार कामगार रखरखत्या उन्हात रस्त्यावर !

नखाते म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून संघटना व शहर फेरीवाला समितीला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने बेकायदेशीर कारवाई सुरू असून अ, ब, क, ड, ग, ह, ई, फ येथे या क्षेत्रिय कार्यक्षेत्रात जागा निश्चिती करताना संघटनेला विश्‍वासात घेऊनच केले पाहिजे अन्यथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अनेक भाजी मंडई ओस पडल्या आहेत. यासाठी योग्य निवड व्हावी आणि समितीला विश्वासात घेऊनच केलं पाहिजे. शहरांमध्ये मुख्य रस्त्यावरती पार्किंगला परवानगी दिली जाते, आम्ही गरजूंसाठी निवडलेल्या २४६ जागा ला मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष  केली जात आहे”. फेरीवाला कायदा २०१४ ची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली.

मनपाच्या फ क्षेत्रामध्ये कृष्णानगर येथे पीएमआरडीए च्या जागेमध्ये बेकायदेशीर हॉकर झोन केलेला आहे. या ठिकाणी बोगस लोक घुसवून त्यांच्याकडून पैशांची वसुलीचा डाव केला जात. ते त्वरीत रद्द करावे. गोरगरीब विक्रेत्यावर महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स व पोलिसांचा दबाव दादागिरी थांबवा, शहर फेरीवाला समितीची बैठक घ्या, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा आदी मागण्या चे निवेदन आयुक्त यांना देण्यात आले.

ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ

यावेळी भूमी जिंदगी चे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांचे बरोबर शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी त्यांनी आयुक्त बरोबर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. २८आणि २९  मार्च च्या देशव्यापी संपाला याप्रसंगी कष्टकरी संघर्ष महासंघाने पाठिंबा दिला.

– क्रांतिकुमार कडुलकर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

जुन्नर : माधुरी कोरडे यांची जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा सदस्यपदी निवड !

संबंधित लेख

लोकप्रिय