गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ या चित्रपटाला ऑस्करला पाठवण्याच्या निर्णयावरुन फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि त्यांच्या निवड समितिची बऱ्याच लोकांनी कठोर शब्दात आलोचना केली आहे. ‘आरआरआर’ किंवा ‘द कश्मीर फाईल्स’सारख्या चित्रपटांना डावलून फेडरेशनने हा निर्णय घेतल्याने बरेच चित्रपटरसिकदेखील निराश आहेत.आता हा चित्रपट मूळ भारतीय चित्रपट नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे आणि त्यावरूनच एक नवा वाद निर्माण झाला आहे.
द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयी (FWICE) या संस्थेने या चित्रपटाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘छेलो शो’ हा मूळ भारतीय चित्रपट नसून एका इटालियन ऑस्कर विजेत्या चित्रपटाची कॉपी असल्याचं या संस्थेचं म्हणणं आहे. फिल्म फेडरेशनच्या अध्यक्षांनी हा चित्रपट ऑस्करसाठी का योग्य आहे हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण हा चित्रपट एका परदेशी चित्रपटाची नक्कल आहे याविषयी मात्र त्यांनी भाष्य करायचं टाळलं आहे.
तसेच हा चित्रपट बाहेरील देशातील संस्थांनी प्रोड्यूस केला असल्याने या चित्रपटाला भारतीय चित्रपट तरी का म्हणावं असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर फेडरेशनचे अध्यक्ष टिपी अगरवाल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, “माझ्याकडे यासंदर्भात काही खात्रीलायक माहिती नाही, त्यामुळे मी याबद्दल काहीच बोलू शकणार नाही. आम्ही हा चित्रपट सगळ्या ज्यूरी मेंबर्सना दाखवला आहे. यातील एकही सीन कॉपी नसल्याचं त्यांनी कित्येकदा नमूद केलं आहे.”
दरम्यान काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी बोलताना सांगितले मोदीजींच्या हट्टामुळे आर आर आर व द काश्मीर फाईल सारख्या चित्रपटांना संधी न देता हा चित्रपट ऑस्करला घालवण्यामागे मोदींचा मोठा हात आहे असे म्हटले आहे.