Junnar / आनंद कांबळे : महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, उपकोषागर कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह आदी सर्व शासकीय कार्यालये एकाच इमारतीत असणारी ३८ कोटी रुपये खर्चाची प्रशस्त प्रशासकीय इमारतीत जुन्नर(Junnar) तालुक्यातील जनतेला शासकीय कामे करून घेण्यासाठी सोयीचे ठरणार असल्याचे प्रतीपादन आमदार अतुल बेनके यांनी केले.जुन्नर येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचे भूमिपूजन, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे प्रवेशद्वार यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षक उज्ज्वला शेवाळे,माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, सुनिल मेहेर, मुख्याधिकारी संदीप भोळे, नायब तहसिलदार सारिका रासकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे केशव जाधव, गोरक्षनाथ आगळे, नगरसेवक फिरोज पठाण, भाऊ कुंभार, सुनील ढोबळे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गणेश महाबरे, नंदू तांबोळी, भूषण ताथेड, धनेश संचेती, जमीर कागदी, वैष्णवी चतुर, कविता छाजेड आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते. (Junnar)
आमदार अतुल बेनके पुढे म्हणाले, जुन्नरमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका इमारतीमध्ये स्पर्धा परीक्षांकरिता लागणारी आवश्यक पुस्तकांकरीता दहा लाखाचा निधी आवश्यक फर्निचर येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वाराचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या ऐतिहासिक धाटणीच्या प्रवेशद्वारामुळे जुन्नरच्या सौंदर्यात भर पडली असून येत्या काही दिवसात येथील परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यात आज किंवा उद्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता
बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना अटक, तर फरार आरोपीचा शोध सुरू
आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट
महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा