पुणे : विवाह ठरवण्याच्या पारंपरिक प्रक्रियेत सहसा वधू किंवा वर पसंत नसल्यास तो नाकारला जातो. मात्र, दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाह निश्चित झालेल्या तरुणीने नवरदेव पसंत नसल्याने त्याच्या हत्या करण्यासाठी चक्क सुपारी दिली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. तर, सुपारी देणारी नवरी मुलगी अद्याप फरार आहे. (Pune Crime)
अहिल्यानगर, श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांडगे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील एका तरुणासोबत ठरला होता. हा तरुण हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. मात्र, हा विवाह तिला मान्य नव्हता. (Pune Crime) त्यामुळे नाराज झालेल्या मयुरीने आपल्या सहकारी संदीप गावडे यांच्या मदतीने नियोजित नवरदेवाच्या हत्या करण्याचा कट रचला. यासाठी तब्बल १.५० लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. (हेही वाचा – मोठी बातमी : 1 एप्रिलपासून वीज दर कमी होणार, सामान्यांना मिळणार दिलासा)
नवरदेवावर प्राणघातक हल्ला | Pune Crime
सुपारी घेतलेल्या आरोपींनी २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटा येथे तरुणावर प्राणघातक हल्ला केला. लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी जखमी तरुणाने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (हेही वाचा – मोठी बातमी : व्लादिमीर पुतिन यांच्या आलिशान कारमध्ये मोठा स्फोट)
तपासादरम्यान, हा हल्ला सुपारी देऊन घडवून आणल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. त्यामध्ये आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सुरज दिगंबर जाधव, इंद्रभान सखाराम कोळपे ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (हेही वाचा – पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज)
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, फरार असलेल्या मयुरी दांडगे हिचा शोध घेतला जात आहे. या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा – शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजित पवारांचे मोठे विधान)