हडपसर : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी प्रतिमा पूजन करुन अभिवादन केले.
तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा त्यांनी घेतला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळेच महिलांना सर्व क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळत आहे.
पिंपरी चिंचवड : आकुर्डीत कवी संमेलन संपन्न
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती!
तसेच त्या भारताच्या पहिल्या स्री शिक्षिका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्वर्गीय विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, आय. क्यु. ए. सी चे समन्वयक डॉ. किशोर काकडे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ.शोभा कोरडे यांनी तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शिल्पा शितोळे यांनी मानले.
आम आदमी पार्टीचा पिंपरीत जल्लोष, देशात आम आदमी पार्टी प्रमुख विरोधी पक्ष – चेतन बेंद्रे