सोलापूर : आपल्या साहित्यातून श्रमिकांच्या व्यथा वेदना मांडणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कॉम्रेड म्हणून साम्राज्यावाद, भांडवलशाही वर लेखणी आणि पहाडी आवाजातून प्रहार केले. अशा लोकशाहीरांना जातीच्या वर्तुळात बंदिस्त करण्याचा डाव प्रतिगामी लोक करत आहेत.याला भेदून समाजवाद प्रस्थापित करणे हे अण्णाभाऊंच्या विचारातील भारत घडवण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी भैय्या चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व टिळक चौक येथील लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पणकरून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माकप चे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे कॉ.दीपक निकंबे व सनी आमाटी यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहारवअर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच शेख यांनी ही मार्गदर्शन केले. या अभिवादन कार्यक्रमाचे प्रस्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.
यावेळी कॉ.व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला, मुरलीधर सुंचू, कुरमय्या म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, विरेंद्र पद्मा, अशोक बल्ला, दाऊद शेख, नरेश दुगाणे, बालकृष्ण मल्याळ, अभिजित निकंबे, शाम आडम, प्रकाश कुऱ्हाडकर, नागेश म्हेत्रे, पांडुरंग म्हेत्रे, शिवा श्रीराम आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.