हडपसर / डॉ.अतुल चौरे : एस. एम. जोशी कॉलेज आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी covid-19 लसीकरण शिबिर 15 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. या लसीकरण शिबिराचे उद्घाटन माजी आमदार चेतनदादा तुपे यांच्या हस्ते करण्यात आले.
ब्रेकिंग : राष्ट्रवादीचे काँग्रेसला मोठे खिंडार, माजी आमदारसह २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
युवकांनी नियमित मास्क वापरला पाहिजे. स्वतःच स्वतःची काळजी घ्या. लसीकरणाची सुविधा महाविद्यालयात सुरू झाली आहे. त्याचा लाभ घ्या. असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले.
इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती
या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ.शंतनू जगदाळे यांनीही विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मा. दिलीपआबा तुपे होते. या लसीकरणासाठी कार्यक्रमाचे संयोजन प्रा. तृप्ती हंबीर, प्रा. विक्रम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नम्रता मेस्त्री यांनी केले. आभार डॉ. संजय जगताप यांनी मानले.
बँक ऑफ बडोदा येथे 220 जागांसाठी भरती