Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचिंचवड शाहूनगर मध्ये महिलांची भव्य लायन्स बाईक रॅली

चिंचवड शाहूनगर मध्ये महिलांची भव्य लायन्स बाईक रॅली

महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला की समाजाची उन्नती होते – प्रिती बोंडे

पिंपरी चिंचवड : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडा संकुल (शनी मंदिर ग्राउंड), पूर्णानगर, शाहूनगर चिंचवड येथे महिलांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. पूर्णानगर, शाहूनगर, संभाजी नगर, शिवतेज नगर या मोठ्या उपनगरातून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये 200 महिलांनी सहभाग घेतला.

डिस्ट्रिक्ट वुमन एम्पॉवरमेंट कमिटी, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबच्या प्रीती बोंडे, हेमंत नाईक, शैलजा सांगळे आणि व विद्यमान नगरसेवक, भाजपचे माजी सत्तारूढ पक्ष एकनाथ दादा पवार यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या उदघाटन नगरसेवक एकनाथ पवार यांनी केले.

मुळा-मुठा नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार, असे असेल नियोजन !


ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाच्या अनुशेष भरतीसाठी विशेष मोहीम राबविणार, ‘इतक्या’ पदांची होणार भरती !

तर जॉईंट डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन वुमेन एम्पॉवरमेंट च्या प्रिती बोंडे म्हणाल्या की,सभ्य आणि सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचे महान कार्य महिलांनी केले आहे. कुटुंबातील महिला माता, भगिनी, गृहिणी, उद्योजक, कर्मचारी म्हणून भूमिका निभावत असताना तिच्या दैनंदिन जीवनात आत्मविश्वास असावा लागतो. स्त्रियांना आत्मविश्वास देण्याचे महान कार्य महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज यांनी केले आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे आज सर्व क्षेत्रात महिला मुली राष्ट्र निर्माणाचे काम करत आहेत.

महिलांनी एक दिवस तरी स्वतः साठी काढावा. हाच उद्देश माझा स्पेशल रॅली काढण्या मागे होता, कारण सर्व वेळ महिलांचा ऑफिस काम घराची जबाबदारी ही पार पडण्यात निघून जातो. स्वत साठी कधी वेळच  नसतो, म्हणुन खास या रॅलीचे आयोजन मी महिला दिनानिमित्त केले. शहरातील महिलांमध्ये आत्म विश्वास वाढला की कुटुंबाची उन्नती होते.

माजी सत्तारूढ पक्ष नेते व विद्यमान नगरसेवक एकनाथ पवार, लायन प्रांतपाल हेमंत नाईक, रिजन चेअर पर्सन लायन मनोज बन्सल, ललिता पवार ऐश्वर्या पवार, वैशाली खामकर, शैलजा सांगळे, लायन प्रीती बोंडे, जयंत बोंडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय