Wednesday, February 5, 2025

१२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी दिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण – अजित पवार

पुणे / रवींद्र कोल्हे : राज्यपालांनी नियुक्त करण्याचा अधिकार असलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील आठवड्यात आठ महिन्यांपासून रखडलेला हा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येत्या आठवडयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याला चर्चेसाठी बोलाविले असल्याची खात्रीशीर माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. “राज्यपालांची वेळ घेऊन आम्ही त्यांना भेटू” असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

विधान परिषदेवरील ‘राज्यपाल नियुक्त’ १२ आमदारांच्या नावांची यादी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली आहे. मात्र त्यावर राज्यपालांनी त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. या नियुक्तिसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मात्र असं असलं तरी हा पेच आता सुटण्याची चिन्हे आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना याबाबत माहिती दिली.

ते पुढे म्हणाले की, नवनियुक्त लोकायुक्त विद्यासागर कानडे यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी राजभवन येथे पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपण स्वतःआणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीत राज्यपालांनी जबाबदारीचे भान ठेवत बारा आमदारांच्या नियुक्ती बाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा असे उच्च न्यायालयाने नमूद केला आहे. मात्र संविधानाने दिलेल्या सर्वोच्च अधिकराप्रमाणे राज्यपाल कोणालाही उत्तर देण्यास बांधील नाहीत. त्यामुळे न्यायालय त्यांना निर्देश देऊ शकत नाही. मात्र असं असलं तरी अनिश्चित काळासाठी संविधानिक जागा रिकाम्या ठेवता येणार नाहीत, याची कारणे देणं गरजेचे असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles