बार्शी : आयटक संलग्न डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघच्या वतीने पूरग्रस्तांसाठी ८१ हजार ४०० रुपयांचा निधी कामगारांच्या वतीने जमा करून देण्यात आला. ही रक्कम एक लाख एक हजार व्हावी यासाठी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांनी या रकमेमध्ये १९ हजार ६०० रुपये जमा केले व ही मिळून होणारी १ लाख १ हजार रुपये रक्कम नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांच्याकडे चेकद्वारे संघटनेचे अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये सुपूर्द करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार काझी उपस्थित होते. हा कार्यक्रम २० ऑगस्ट २०२१ रोजी डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल येथे पार पडला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, मेडीकल सुप्रींडेंन्ट डॉ.रामचंद्र जगताप, संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ. लहू आगलावे, सचिव धनाजी पवार, कॉ. प्रविण मस्तुद, डॉ. सुरेश सावंत, डॉ.हर्षद बारसकर, डॉ. सुरेखा माळवे, कॉ. भारत भोसले, भारती मस्तुद, महादेव ढगे, बिभीषण हुरकूडे, संगीता गुंड, किसन मुळे, शहापरि शेख, शिवकन्या भोसले आदी उपस्थित होते.